कडवईत जाधव कुटुंबीयांच्या २१ दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप

कडवई: -मुजीब खान

गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थानपन्न झालेल्या व तब्बल २१ दिवस जाधव कुटुंबीयांच्या घरी गणेश भक्तांचे पाहुणचार घेतल्यानंतर कडवईतील जाधव कुटुंबीयांच्या घरच्या गणरायाला शुक्रवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला.   

.गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या ,चे साकडे घालत गणेश भक्तांनी लाडल्या बाप्पाला निरोप  दिला.अशा प्रकारे जाधव कुटुंबीयांच्या घरच्या २१ दिवसाच्या गणेश विसर्जनाने यावर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.
जाधव कुटुंबीयांच्या २१ दिवसाच्या बाप्पांना शुक्रवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला.मिरवणूकीत कडवईतील बहुसंख्येने गणेश भक्तांनी भाग घेतला.पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.