महाराष्ट्र दिनानिमित्त रिक्षा मालक-चालक संघ, कडवई-तुरळ-चिस्त्रली यांच्यातर्फे श्री सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रम

मुख्य पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला; नाट्यगंधा प्रस्तुत “वेगळं व्हायचंय मला” या नाटकाने श्रोत्यांची मने जिंकली

*कडवई, १ मे २०२५ –(दिपक तुळसणकर)

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रिक्षा मालक-चालक संघ, कडवई-तुरळ-चिस्त्रली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

🔵 *धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद*
सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, तर भक्तीमय वातावरणात दुपारी २ ते ३.३० या वेळेत विश्वकर्मा भजन मंडळ, कडवई (सुतारवाडी) यांचे भजन झाले. त्यानंतर ३.३० ते ५.३० या वेळेत रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी भजन सादर केले. संध्याकाळी ६ ते ८.३० या वेळेत गणेश मंदिर, कानालवाडी (चिखली) येथे हरिपाठाचे आयोजन झाले.

🔵 *सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा*
रात्री १० वाजता रिक्षा संघटनेतर्फे गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानंतर श्री समर्थ नाट्यगंधा (रिक्षा संघटना) प्रस्तुत “वेगळं व्हायचंय मला” हे दोन अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याचे सामाजिक नाटक सादर करण्यात आले. या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

🔵 *प्रमुख मान्यवरांची उपस्थिती*
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री. राजवर्धन करपे (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी), श्री. शिवप्रसाद पारवे (पोलीस उपअधीक्षक), श्री. अजितराव ताम्हणकर (सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी) व श्री. प्रशांत जाधव (मोटर वाहन निरीक्षक) यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.

हा संपूर्ण कार्यक्रम कडवई बाजारपेठेत अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने पार पडला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×