तुरळचे सरपंच सहदेव सुवरे यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्तीमुळे संगमेश्वर तालुक्यात आनंद व अभिमानाचे वातावरण
कडवई :
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावचे विद्यमान सरपंच श्री. *सहदेव विठ्ठल सुवरे* यांना त्यांच्या सामाजिक व लोकोपयोगी कार्याची दखल घेऊन एकात्मिक समाज कल्याण संस्था आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन, बेलगावी यांच्या संयुक्त विद्यमाने *राष्ट्रीय पुरस्कार पत्र* प्रदान करण्यात आले.
*रविवार, दिनांक २७ एप्रिल २०२५* रोजी *रवींद्र भवन, साखळी, गोवा* येथे पार पडलेल्या भव्य समारंभात श्री. सुवरे यांना विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा हार आणि केंद्रीय मंत्र्यांकडून अभिनंदन पत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
या राष्ट्रीय सन्मानाच्या निमित्ताने *संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने* श्री. सहदेव सुवरे यांचा *सत्कार सोहळा* आयोजित करण्यात आला. हा सत्कार *पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. मुजीब खान* यांच्या हस्ते *हॉटेल थ्री गर्ल* येथे पार पडला.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष *वहाब दळवी,* सचिव *धनंजय भांगे,* उपसचिव *मिलिंद कडवईकर,* उपखजिनदार *नियाज खान,* पत्रकार *दीपक तुळसणकर, फडकले,* तसेच संघाचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने श्री. सुवरे यांचा *पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान* करण्यात आला.
श्री. सहदेव सुवरे यांच्या क्रियाशील व लोकसेवाभिमुख कार्याची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल ही केवळ त्यांच्या वैयक्तिक गौरवाची बाब नसून संपूर्ण संगमेश्वर तालुक्यासाठीही एक *गौरवाचा व अभिमानाचा क्षण* ठरला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.