ए.ई. काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई – बारावीचा १००% निकाल!

कडवई:

एज्युकेशन सोसायटी कडवई अंतर्गत कार्यरत असलेल्या *ए.ई. काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई* येथे बारावी विज्ञान शाखेचा निकाल (वर्ष २०२४–२५) उत्साहवर्धक आणि गौरवशाली ठरला आहे. या परीक्षेत एकूण *१६ विद्यार्थी* सहभागी झाले असून सर्वांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा निकाल *१००% टक्के* राहिला आहे.

🔹 *विद्यार्थ्यांची गुणवत्तानुसार यादी पुढीलप्रमाणे:*

१. मुल्ला रिया जलील – ६७.८३% (प्रथम क्रमांक)
२. हफसानी महंमद साद समान – ६२.५०% (द्वितीय क्रमांक)
३. कडवईकर श्रेया पंढरीनाथ – ६०.००% (तृतीय क्रमांक)
४. नायकोडी मोहतसीम सादिक – ५८.८३% (चतुर्थ क्रमांक)
५. खान अंझर अफसर – ५४.१७% (पंचम क्रमांक)

🔹 *निकाल वर्गवारीनुसार तपशील:*

३ विद्यार्थी – पहिली श्रेणी

४ विद्यार्थी – दुसरी श्रेणी

९ विद्यार्थी – उत्तीर्ण वर्ग

या यशाबद्दल कॉलेजचे *मुख्याध्यापक श्री. कारिगर, शिक्षकवर्ग, non-teaching staff, कॉलेज व्यवस्थापन, मस्जिद व कबरस्तान कडवई (जमातुलमुस्लिमीन कडवई) कार्यकारिणी, तसेच संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी* यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×