डीकेटीईचे प्रा. मंजुनाथ रावळ यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि ३: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये जनरल इंजिनिअरींग विभागात कार्यरत असणारे प्रा. एम.आर.रावळ यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा एम.आर.रावळ हे गेली १२ वर्षापासून सहायक प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘ऍन एक्सपेरिमेंन्टल इन्व्हेस्टीगेशन फॉर जॉयनिंग ऑफ निकेल बेसड अलॉय युसिंग मायक्रोवेव हायब्रीड हिटींग’ या विषयावर पी.एच.डी.प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी त्यांना सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कणकवलीचे प्राचार्य डॉ दुरादुंडी सावंत बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
      पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या डायरेक्टर डॉ. एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ. ए.के.घाटगे, डॉ व्ही.आर.नाईक उपस्थित होते. 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.