आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून कळंबस्ते दर्गा रस्त्याच्या कामाची सुरुवात
कळंबस्ते:-तैमिना वणू
संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून कसबा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे.
कळंबस्ते मोहल्ला दर्गाकडील रस्त्याच्या कामाची सुरुवात देखील करण्यात आली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे धडाडीचे युवा नेतृत्व मजीदभाई नेवरेकर, सह्याद्री फॉउंडेशन चे अध्यक्ष श्रीराम शिंदे, कळंबस्ते ग्रामपंचायत सदस्य अकबरकाका दसुरकर, उपसरपंच सबिया नेवरेकर, आसिफभाई धामस्करयांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे या परिसरातील विविध विकास कामे होत असलेली आपणांस दिसत आहेत त्यापैकी एक कळंबस्ते मोहल्ला दर्गाकडील रस्त्याच्या कामाची सुरुवात देखील करण्यात आली आहे.या रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय आमदार शेखरजी निकम यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.