विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करावी : ज्ञानदेव वाकुरे

शरद अॅग्रीकल्चर पारितोषिक वितरण

 

 

जयसिंगपूर: विजय घंगेकर

दि.19 आजच्या घडीला विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या निरनिराळ्या संधी उपलब्ध आहेत, या संधीचा कृषिच्या विध्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. सुरुवातीपासून ध्येय निश्चित करून तयारी केल्यास यश हे नक्की मिळेल. त्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांचा पुरेपूर वापर करावे. असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरेसो यांनी केले. ते जैनापूर येथील शरद अॅग्रीकल्चर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सौ. स्वरूप पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थिती होते.

श्री वाकुरे म्हणाले, शेती, उद्योग, स्पर्धा परीक्षा, भारतातील विपणन पद्धती व त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना असणाऱ्या संधी ह्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता सर्व क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून द्यावे. तसेच पुस्तके व वर्तमानपत्र वाचनावर भर द्यावा. याप्रसंगी श्री. वाकुरे यांचे हस्ते विद्यालयाच्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या शैक्षणिक वर्षातील बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड कु. संन्मती वरदाई व बेस्ट पासिंग स्टुडन्ट अवॉर्ड कु. नेहा सपकाळ हिला देण्यात आला.

श्री. बागणे म्हणाले, शरद अॅग्रीकल्चरच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा तसेच या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उच्चपदस्थ व्हावे यासाठी कॉलेजकडून व व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना सर्वोत्तपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शेतीविषयक नवतंत्रज्ञान, विद्यार्थ्यांनी रेखाटलेले विविध चित्र, रेखाचित्र, फोटो तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळ्या यांची सर्वांनी पाहिले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्स्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सचिन तोडकर यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. कु. संन्मती वरदाई या विद्यार्थिनीने महाविद्यालयिन कला व क्रीडा अहवाल सादर केला. आभार कु. राधिका निर्मल या विद्यार्थिनींने मानले. या प्रसंगी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. संजय फलके, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.