नवीन डांबरीकरण केलेले खालील पाण्याच्या पाईपला गळती

रत्नागिरी : प्रतिनिधी
दि. १६ मे. येथील मारुती मंदिर ते मजगाव रोड जवळ गोडबोले स्टॉप जवळ पाण्याची पाईप लाईन फुटल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी दिसत आहे . ही पाईपलाईन नवीन असताना देखील लिकेज झाली आहे तसेच नवीन डांबरीकरण झाल्यानंतर या पाइपलाइनच्या गळती मुळे रस्त्यावरती पाणीच पाणी दिसत आहे शहरात काही भागात डांबरीकरणानंतर असे प्रकार घडत आहे हे असे किती दिवस चालू राहणार असे नागरिक प्रश्न विचारत आहे तसेच नवीन पाईप लाईन प्रत्येक वेळी नव्या ठिकाणी फुटत असल्याने या पाइपची योग्यता आणि ठेकेदार त्याच्या कामाचा दर्जा यावर नागरिकांचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळेे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत ठेकेदाराला काळ्या यादीत  टाकावे असेेे सामाजिक कार्यकर्तेेे यांच्याकडून बोलले जात आहे .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.