कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर
रत्नागिरी : मुजीब खान
दि. : १८ मे. : कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पारकर यांनी यापूर्वी कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी पारकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त कोकण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागीय वन अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे उपसंचालक हे या समितीचे सदस्य असणार आहेत. तर पर्यटन संचानालयाचे विभागीय उपसंचालक या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. या समितीचे मुख्य कार्यालय कोकण भवन नवी मुंबई येथे असणार आहे. या निवडीबद्दल पारकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.