संगमेश्वर रोड रेल्वेस्थानक होणार आता समस्यामुक्त.
आरवली: सचीन पाटोळ
दि. ४ जुलै : संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकातील सुविधा आणि रेल्वे थांबा संदर्भात येथील नागरीकांची लढाई गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे.संगमेश्वरवासिय रेल्वे प्रवाशांच्या सुखसोयीसाठी संघर्ष करत असताना स्थानकावर तुटलेले पेव्हर ब्लॉक, निवारा शेड, दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, स्थानकाकडे येणारा खड्डेमय रस्ता यासाठी येथील पत्रकार संदेश जिमन हे सातत्याने पत्रव्यवहार करत होते. आ. शेखर निकम यांनीसुद्धा सदरच्या कामात मोलाचे सहकार्य केले आहे.
त्यापैकी निवारा शेडचे काम पूर्णत्वास जात आहे. पेव्हर ब्लॉकचे काम प्रगती पथावर आहे आणि खड्डेमय रस्त्याची पाहणी करण्यासाठी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अभियंता जयसिंग थोरात हे संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकामध्ये आले होते.
त्यांच्यासोबत संदेश जिमन आणि त्यांचे सहकारी सुद्धा होते. इंजिनियर यांनी सदर रस्त्याची पाहणी केल्यानंतर रस्ता तयार करण्याची मागणी मान्य केली. परंतु पावसाळा असल्यामुळे डांबरीकरण होऊ शकत नसल्याचे सांगितले.
तो पर्यंत खड्डे सिमेंटने भरून देऊ व पावसाळा संपताच महामार्गाने रेल्वे स्टेशन हा रस्ता 12 लाख रुपये खर्च करून संपूर्ण सुखसोईयुक्त असा डांबरी रस्ता करून देऊ असे लेखी पत्र इंजिनियर जयसिंग थोरात यांनी दिले आहे.
या वेळी संतोष पाटाने ,नरेंद्र खानविलकर ,दीपक पवार, गणपत दाभोलकर ,संजय मापूस्कर, जगदीश कदम, मुकुंद सनगरे आणि संगमेश्वर व्यापारी संघटना रिक्षा संघटना चे सहकारी उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.