कुटगिरी – पाचांबे हद्दीवर भीखोल दरीत केंद्र सरकारचा वीजनिर्मिती प्रकल्प व्हावा
राजिवली ग्रामपंचायत उपसरपंच संतोष येडगे
आरवली : सचीन पाटोळे
दि. २२जुलै : वीजनिर्मिती चा कोयना विद्युत प्रकल्प अविरतपणे सुरू आहे या कोयना विद्युत प्रकल्पातून महाराष्ट्राला वीजपुरवठा करण्यात येतो अशा पाण्यापासून वीजनिर्मिती करणा-या प्रकल्पांमुळे राज्यातील वीज टंचाई दुर करण्यास सरकारला यश येत असल्याने पाण्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कुटगिरी येडगेवाडी आणि पाचांबे गावांच्या हद्दीवर भीखोल दरीत वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्यात यावा अशी मागणी राजिवली ग्रामपंचायत उपसरपंच संतोष येडगे यांनी केली आहे.
गडनदी धरणाच्या बॅकवॉटर आणि चांदोली धरणाच्या बॅकवॉटर च्या मधोमध असलेल्या भीखोल या ठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्पासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले असून गडनदी धरणातील पाणीसाठ्याचा वापर करुन ते पाणी वापरता येते का किंवा पावसाच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्यामधून ही वीजनिर्मिती करावी या बाबत विचार सुरु आहे या विषयी केंद्र सरकारच्या नियुक्त संस्थेच्या माध्यमातून सर्व्हेक्षण सुरु असून तशा पद्धतीने चर्चा झाल्याचे उपसरपंच संतोष येडगे यांनी सांगितले तर धरण आणि त्यातील पाणी साठा अथवा पावसाच्या पाण्याचे संकलन करुन त्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प होणे ही चांगली बाब आहे. यामुळे येथील परीसराची नैसर्गिक हानी होणार नसून प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार आणि गावाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार आहे. आपण या प्रकल्पासाठी पुढाकार घेवून प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य करणार असल्याचे यावेळी श्री.येडगे यांनी सांगितले आहे या विषयी लवकरच संबंधित यंत्रणेतील अधिका-यांच्या गाठीभेटी घेवून सकारात्मक चर्चा होईल असा विश्वास उपसरपंच श्री.येडगे यांनी व्यक्त केला आहे .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.