दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप.बँकेची २७ वी वार्षिक सभा खेळीमेळीत
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १९ ऑगस्ट : येथील दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप. बँक लि; इचलकरंजी या बँकेची सन २०२१-२२ सालची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लायन्स ब्लड बँक हॉल, दाते मळा, इचलकरंजी येथील सभागृहात रोजी पार पडली. सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व लक्ष्मी फोटो पूजनाने झाली. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा ध्वजास अभिवादन करून राष्ट्रगीत गायन झाले .
स्वागत व प्रास्ताविक बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री.विलासराव गाताडे यांनी केले. बँकेचे व्हा.चेअरमन श्री.बाळासाहेब बरगाले यांनी श्रद्धांजली ठराव मांडून अहवाल सालातील मृत व्यक्ती व सभासद यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सन २०२१-२२ या आर्थिक सालाच्या अहवालाचे वाचन व अध्यक्षीय मनोगत बँकेचे चेअरमन श्री.राजगोंडा पाटील यांनी केले, बँकेच्या वाटचालीत सहकार महर्षी आदरणीय मा. श्री. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) व आमदार मा. श्री. प्रकाशरावजी आवाडे (आण्णा) यांचे मोलाचे सहकार्य लाभलेचे नमूद केले. अहवाल सालातील आर्थिक मंदी तसेच कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रतिकूल परिस्थितील बँकेच्या कामगिरीविषयी माहिती सभेपुढे सादर केली. बँकेकडे एकूण रु. १२३ कोटी ४७ लाखाच्या ठेवी असून एकूण रु.६७ कोटी ०९ लाखाचे कर्ज वाटप केलेचे नमूद केले. बँकेची एकूण गुंतवणूक रु.६२ कोटी १२ लाख इतकी आहे. बँकेचा सी.आर.ए.आर (भांडवल पर्याप्तता निधी) १५.४५ % इतका आहे. अहवाल सालात बँकेस रु.१ कोटी ६४ लाख इतका ढोबळ नफा झाला असून इन्कम टॅक्स व अन्य तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रु.८९ लाख ०३ हजार इतका झालेचे सांगितले. तसेचबँकेच्या वैधानिक लेखापरीक्षक यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून बँकेस लेखापरीक्षण वर्ग “अ” प्रदान केलेचे सांगितले.त्यानंतरसभेची नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन बँकेचे जनरल मॅनेजर श्री.दिपक काटकर यांनी केलेत्यास उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
मान्यवरांचे तसेच सदर सभेस उपस्थित राहिलेल्या सर्व सभासद-बंधू-भगिनींचे आभार बँकेचे संचालक श्री.गजानन लोंढे यांनी मानले. सदर सभेस क.आ.इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक श्री.स्वप्निल आवाडे, श्री.बंडोपंत लाड, जवाहर सहकारी साखर कारखाना लि; हुपरी चे उपाध्यक्ष श्री.बाबासो चौगुले, संचालक श्री.आदगोंडा पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्री.बाळासाहेब कलागते, मध्यवर्ती हातमाग विणकर संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश दत्तवाडे, विरशैव बँक, कोल्हापूर चे व्हा.चेअरमन श्री.अनिल स्वामी, आजरा अर्बन बँक, आजरा चे व्हा.चेअरमन श्री. किशोर भुसारी, ज्येष्ठ कामगार नेते श्री.शामराव कुलकर्णी, व्यापारी पत संस्थेचे चेअरमन श्री.सुर्यकांत साखरे व संचालक मंडळ सदस्य, श्री.आर्य चाणक्य पत संस्थेचे अध्यक्ष श्री.जवाहर छाबडा, क.आ.इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे माजी सी.ई.ओ श्री.पी.टी.कुंभार, बँकेचे माजी सी.ई.ओ श्री.सुभाष मिठारी, उद्योगपती श्री.कैश बागवान, चौंडेश्वरी सुत गिरणीचे चेअरमन श्री.संजय कांबळे, व्हा.चेअरमन श्री.विलास पाडळे, श्री.आर.के.पाटील, श्री.आनंदराव नेमिष्टे, श्री.अमित गाताडे, श्री.नंदू पाटील, श्री.मनुशेठ हिराणी, श्री.महेश बोहरा, श्री.संजय सुतार तसेच बँकेचे संस्थापक चेअरमन श्री.इरगोंडापाटील, संचालक मंडळ सदस्य श्री.चंद्रकांत बिंदगे, श्री.राजेंद्र शिरगुप्पे, श्री.राजकुमार पाटील, श्री.दशरथ मोहिते, श्री.व्यंकटेश शहापूरकर, संचालिका सौ.शोभा कडतारे, तज्ञ संचालक श्री.जयप्रकाश शाळगांवकर, श्री.संजय व्हनबट्टे तसेच बँकेचे कर्मचारी इ.उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.