दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि. १७ आमदार मा. प्रकाश आवाडे यांनी नुकतीच वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन वस्त्रोद्योगातील विविध प्रश्नांची चर्चा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात वीज अनुदानाचा प्रश्न येत्या दोन ते तीन महिन्यात सोडविणेत येईल व अन्य जे प्रश्न आहेत ते सुद्धा नजीकच्या काळात नवीन धोरणानुसार सोडविणेत येतील अशी माहिती दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप असोसिएशनचे नवनिर्वाचीत संचालक मंडळाने आमदार प्रकाश आवडे यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतलेवेळी दिली.

दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. या असोसिएशनमधील सर्व नूतन कार्यकारणीतील संचालकांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाशराव दत्तवाडे यांची भेट घेतली. यावेळी सर्व नवीन संचालकांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सदर भेटीवेळी आमदार मा.प्रकाश आवाडे यांनी नुकतीच वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी वस्त्रोद्योग विभागातील अधिकारीही उपस्थित होते. याभेटीमध्ये वस्त्रोद्योगातील विविध अडचणींवर चर्चा झाली. यामध्ये पहिल्या टप्यात वीज अनुदानाबाबत प्रामुख्याने २७ एच.पी. खालील यंत्रमागधारकांच्या वीज दारात रु. १ ची सवलत व २७ एच.पी. वरील यंत्रमागधारकांच्या वीज दारात ७५ पैशांची सवलत याबाबतचा प्रस्ताव सादर करणेचे आदेश वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात निर्णय होऊन येत्या दोन ते तीन महिन्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल असे सांगितले. तसेच नवीन वस्त्रोद्योग धोरणामध्ये ५% व्याज अनुदाना अंतर्भाव करणेत येईल आणि त्याचीसुद्धा अंमलबजावणी करणेत येईल असे सांगितले.

यावेळी दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप असोसिएशनचे नवनिर्वाचीत संचालक सतीश कोष्टी, महंमदरफिक खानापूरे, राजगोंडा पाटील, पांडूरंग सोलगे, चंद्रकांत पाटील, किरण पोवार, राजाराम गिरी, सुभाष बलवान, चंद्रकांत भोपळे, दत्तात्रय टेके, सोमा वाळकुंजे, संचालिका सौ.महादेवी खोत व श्रीमती हमिदा गोरवाडे उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.