फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फौंडेशनकडून महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप

रत्नागिरी,: नियाझ खान 

दि. 3  : सामाजिक बांधिलकी म्हणून फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे आज वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रस्त्यांवरील अपघातांच्या प्रमाणात दुचाकी वाहनांचे प्रमाण अधिक असून, सुरक्षित प्रवासासाठी पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात येत असल्याचे श्री. चिवटे यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी कौतुक करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी श्री. सिंह आणि श्री. चिवटे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.