करवीर पोलीस ठाणे च्या माध्यमातून नविन कायदे जनजागृती मोहीम
कोल्हापूर :रेणू पोवार
दि .३ जुलै : कोल्हापुरातील करवीर पोलिस ठाणे च्या वतीने ,१ जुलै २०२४ रोजी नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी आणि सामान्य जनतेला त्याची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून मा. अप्पर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर श्रीमती जयश्री देसाई व करवीर पोलीस ठाणे निरीक्षक अधीक्षक श्री शिंदे यांच्या उपस्थित मार्गदर्शन व चर्चा सत्र कोल्हापुरातील वसंत हरी मल्टीपर्पज हॉल, फुलेवाडी नाका येथे पार पडले . नवीन कायद्याची नागरिकांना सविस्तर माहिती अप्पर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर श्रीमती जयश्री देसाई व करवीर पोलीस ठाणे निरीक्षक अधीक्षक श्री शिंदे यांनी दिली .
यावेळी कार्तिकी तोरणे,सौ रेणुताई पोवार पत्रकार,अर्जुन पोवार, पोलीस मित्र सौ शोभा खेडकर ,सर्व गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मंडळे, विद्यार्थी, महिला बचत गट, महिला पदाधिकारी मंडळे, पालक वर्ग, व्यापारी, दुकानदार, पोलीस मित्र संघटना ,पोलीस पाटील, नागरिकांनी उपस्थित होते. सुत्रसंचालन कोल्हापूर करविर पोलीस ठाण्याचे गोपनिय विभागाचे पोलीस श्री अविनाश पोवार यांनी केले.तसेच प्रत्येक गावोगावी,व खेडेपाडि कायद्याचे जनजागृती मोहिम राबविण्यात आली . जेष्ठ नागरिक यांनी अप्पर पोलीस सौ जयश्री देसाई व करवीर पोलीस ठाणे निरीक्षक अधीक्षक श्री शिंदे यांना वृक्ष रोप देऊन सत्कार केला .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.