डीकेटीईच्या नऊ विद्यार्थ्यांची ग्लोबलएडज सॉफ्टवेअर कंपनीत निवड

इचलकरंजी: संजय आंबे
ता. १३ येथील डिकेटीई मधील अंतिम वर्षात शिकणा-या कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरींग, इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स व इटीसी इंजिनिअरींग च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ग्लोबलएडज या सॉफ्टवेअर कंपनीच्या ऑनलाईन कॅम्पस प्लेसमेंट मधून नऊ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
लॉकडाउनच्या काळात देखील विद्यार्थ्यांचे १०० टक्के क्वालिटी प्लेसमेंट व्हावे यासाठी डिकेटीई मार्फत ऑनलाईन इंटरव्हयूचे वेळोवेळी आयोजन करण्यात येत आहे.
ग्लोबलएडज सॉफ्टवेअर कंपनी यांचे बेंगळुरु येथे मुख्य कार्यालय असून ही प्रॉडक्ट बेसड सॉफ्टवेअर कंपनी आहे.  ग्लोबलएडज ही एम्बेडेड सॉफ्टवेअर सोल्युशन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी सॉफ्टवेअर कंपनी असून सेमीकंडक्टर्स, ऑटोमोटीव्ह, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन्स आणि इंडस्ट्रीयल ऑटोमेशन इ. क्षेत्रात उत्पादन अभियांत्रिकी कंपनी आहे. यावेळी ऑनालाईन पध्दतीने आयोजित केलेल्या इंटरव्हयूवमध्ये अ‍ॅप्टीटयुट टेस्ट, कोडींग टेस्ट, दोन टेक्निकल फे-या, आणि शेवटी एचआर फेरी इ.फे-यांमधून रुतूजा कुलकर्णी, पार्थ पाटील,ऐश्‍वर्या कणसे,शांभवी पनवेलकर,अंकिता मगदूम, अनिकेत हिरेमठ, प्रतिक दुरुककर, सोनाली कडोलकर व मुणेर मुल्ला या नऊ  विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या यशाबददल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, सचिव सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, प्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे, विभागप्रमुख डॉ. डी.व्ही. कोदवडे, प्रा डॉ एस.ए.पाटील, टीपीओ प्रा.जी.एस.जोशी तसेच सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.