डीकेटीईच्या एमसीए विभागातील पार्श्‍व कळंत्रे याची सायबर फॉरेन्सिक क्षेत्रात दमदार झेप

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.१३: – डीकेटीईच्या एमसीए विभागातील विद्यार्थी पार्श्‍व नितिन कळंत्रे  याची ओडिशा शासनाच्या सीआयडी क्राईम ब्रँच, भुवनेश्‍वर येथे सायबर फॉरेन्सिकस असिस्टंट / डिजीटल फॉरेन्सिकस अ‍ॅनिलीस्ट म्हणून निवड झाली आहे. सायबर गुन्हे तपास, डिजीटल पुराव्यांचे विश्‍लेषण आणि फॉरेन्सिक तपासणी या महत्वपूर्ण क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाली आहे.सायबर फॉरेन्सिक क्षेत्रातील आपल्या तांत्रिक कौशल्याचा प्रभावी उपयोग करीत पार्श्‍वने बँक फसवणुकीशी संबंधित एका प्रकरणाच्या तपासात महत्वपूर्ण मदत केली होती. डिजीटल पुरावे शोधणे, त्यांचे विश्‍लेषण करणे तसेच सायबर गुन्हयांशी संबंधीत माहितीचा तांत्रिक पध्दतीने मागोवा घेण्यामध्ये त्याने केलेले योगदान उल्लेखन्नीय ठरले. या अनुभवातून त्याची सायबर गुन्हे तपास क्षेत्रातील क्षमता आधोरेखीत झाली.
पार्श्‍वची ही निवड त्याच्या तांत्रिक कौशल्य, गुणवत्ता आणि सायबर फॉरेन्सिक क्षेत्रातील प्राविण्याचे द्योतक आहे. डिजीटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारी सायबर गुन्हयांची आव्हाने लक्षात घेता, डिजीटल पुरावे संकलित व विश्‍लेषित करणा-या कुशल तज्ञांची गरज मोठया प्रमाणात वाढत आहे. अशा महत्वपूर्ण क्षेत्रात पार्श्‍वने मिळविलेले यश निश्‍चितच कौतुकास्पद आहे.
डीकेटीई मध्ये उपलब्ध असलेली आयडिया लॅब, इन्व्होवेशन सेल व स्टार्टअप कटटा तसेच डीकेटीईतील विविध आधुनिक लॅबमार्फत विद्यार्थ्यांना विविध संशोधनाचे मार्गदर्शन केले जाते यामुळे अशा सायबर गुन्हे तपास संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना या लॅबमधील सुविंधाचा लाभ होतो व देशापातळीवर आपली गुणवत्ता होते.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी पार्श्‍वला शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. सुलभा माणगांवे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.