इचलकरंजी व्यापारी पतसंस्थेचा 15 टक्के डिव्हिडंड : सुर्यकांत साखरे
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २४ ऑगस्ट :येथील इचलकरंजी व्यापारी पतसंस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नामदेव भवन, इचलकरंजी याठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सुरवातीस उपस्थित सभासद व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. विलासराव गाताडे यांनी केले. उपस्थित ज्येष्ठ सभासद व मान्यवरांच्या हस्ते फोटोपुजन व दिपप्रज्वलन करून सभेस सुरवात झाली. प्रथम विविध क्षेत्रातील दिवंगत व्यक्ती व मयत सभासदांना श्रध्दांजलीचा ठराव संचालक बाळासाहेब बरगाले यांनी मांडला.
चेअरमन श्री. सुर्यकांत साखरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेवुन संस्थेच्या प्रगतीविषयी सविस्तर विवेचन केले. संस्थेकडे अहवाल सालात वसुल भाग भांडवल रू. 64 लाख 79 हजार इतके असुन सर्व निधी रू. 3 कोटी 81 लाख इतक्या आहेत. ठेवी 14 कोटी 20 लाख असुन गुंतवणुक रु. 10 कोटी, कर्जे रु. 9 कोटी 92 लाख इतकी आहेत. संस्थेचे एकुण खेळते भांडवल रु. 21 कोटी 23 लाख इतके आहे. संस्थेस अहवाल सालात सर्व खर्च वजा जाता रू. 67 लाख 58 हजार इतका भरघोस नफा झालेला आहे. संस्थेचे एकुण कर्जाशी थकवाकीचे प्रमाण 00.49 टक्के इतके नाममात्र असुन यावर्षी देखील एन.पी.ए. शुन्य टक्के राखण्यात संस्थेला यश आलेले आहे. त्यामुळे यावर्षी देखील सभासदांना 15 टक्के डिव्हिडंड देणेचा मानस त्यांनी व्यक्त केला. विषय पत्रिका वाचन व्यवस्थापक विश्वनाथ रोडे यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजुर झाले.
सभेच्या निमित्ताने वडगाव बाजार समितीच्या संचालक पदी निवड झालेबद्दल श्री. सागर मुसळे व संजय वठारे यांचा सत्कार संस्थेचे माजी चेअरमन इरगोंडा पाटील यांच्या हस्ते करणेत आला. सदर सभेस दि. इचल मर्चंटस बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील, संचालक चंद्रकांत बिंदगे, कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे संचालक बाबासो पाटील तसेच उद्योगपती सुरेश नगरसेवक जहाँगिर पटेकरी, माजी संचालक श्रीकांत कोरवी, दत्तात्रय कुंभोजे उपस्थित होते. संस्थेचे व्हा. चेअरमन शशिकांत शेटके, संचालक सुभाष तोडकर, दिलीप वणकुद्रे, विलास कोरवी, विलास चव्हाण, सुरेंद्र हुक्केरी, प्रदीप करंबळे, नकुल झेले, सौ. छाया कोंडारे, सौ. लक्ष्मीबाई पाटील, तज्ञ संचालक सुभाष पाटील, सेवकवर्ग, पिग्मी एजंट उपस्थित होते. शेवटी आभार संजय वठारे यांनी मानले. राष्ट्रगीत होवुन सभा संपन्न झाली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.