संगमेश्वर ग्रृप ग्रामपंचायत राजिवली येथे मोफत डीजिटल सातबारा वाटपाचा शुभारंभ
आरवली :सचिन पाटोळे
२ आॕक्टोबर रोजी स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव तसेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती असा सुवर्ण योग साधून संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत डिजिटल सातबारा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यानंतर कुटगीरी सजेचे तलाठी श्री व्यवहारे यांनी कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थ व शेतकरी वर्गाचे स्वागत करून सातबारा वाचन कसे करायचे तसेच ई.पिकपाणी नोंदणी ॲप बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला सरपंच सौ. शमिका सचिन पाटोळे, ग्रामसेवक दत्ताञय गायकवाड,पोलीस पाटील शांताराम निकम,कुटगीरी सजाचे तलाठी राहुल व्यवहारे,कोतवाल सुभाष कांळबे,ग्रामपंचायत शिपाई दीपक घाडगे,संजय पाटोळे,राजाराम पाटोळे,कृष्णा पाटोळे,दौलत मेणे तसेच शेतकरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.