समीर जमादार युवा मंचच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवराचा पुरस्कार देवून गौरव

इचलकरंजी : लखन जाधव
दि. १७ :विक्रमनगर येथील समीर जमादार युवा मंचच्या वतीने ईद ए मिलाद्दुनबी अर्थात पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना मान्यवर व्यक्तींचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला.
समीर जमादार युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. दत्तात्रय माने यांना समाजभूषण पुरस्कार, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल माणुसकी फौउंडेशन चे रवि नौशाद जावळे यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य, शबाना रशीद ढालाईत यांना (इंग्रजी माध्यम) आदर्श शिक्षिका, अ‍ॅड. जिया गफार शेख यांना उत्कृष्ट वकील, मुज्जमिल कमाल मुजावर यांनी इचलकरंजी शहर व ग्रामीण भागात नेत्र तपासणी शिबिर घेवून 16 हजार नागरिकांना लाभ मिळवून दिल्याबद्दल उत्कृष्ट सामाजिक क्षेत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच भागातील विधवा व निराधार महिलांना साडी वाटप, गरजू शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर जमादार यांनी केले.
कार्यक्रमास आमदार राजुबाबा आवळे, काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य मदन कारंडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक संचालक स्वप्नील आवाडे, विठ्ठल चोपडे, राहुल खंजीरे , सुनील पाटील, ताजुद्दीन खतीब, नजमा शेख, स्मिता तेलनाडे, विद्या भोपळे मच्छिंद्र नगारे, रमाकांत जाधव, इम्रान मकानदार, मंगेश कांबुरे , गणेश सावरतकर, पांडूनाना बीरांजे, भारत बोगार्डे, राजु भाई असगर, अझहर डफेदार, नासीर गवंडी, आलम मोमीन, योगेश कांबळे, सचिन कांबळे, शबनम जमादार, रेश्मा मोमीन, बेगम कौजलगी, शमशाद जमादार, आसमा बारगीर, शाहीन मुल्ला, सना जमादार, साहिल जमादार, साजिद जमादार, मुस्तफा सरकावस, अबुबेद सुतार, साद जमादार, सोहेल कुरणे, साहिल मुल्ला, शोएब मुजावर, सोहेल सय्यद, शहिद फणीबंद, आयान मोमीन, कैफ जमादार, सलमान पटेल, अशिदुल्ला दरुवाले, मुन्ना शेख, सागर साळुंखे, अलंकार खेडकर, रफिक शेख, इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते. आभार समीर जमादार यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.